Wednesday, March 15, 2017

प्रस्तावना (मराठी)


  रेल्वे या गोष्ट लहानपणी पासूनच सगळ्यांनाच कुतूहल असते. लहानमुलांना झुकझुक गाडी वाफ उडवत जाताना दिसली तर त्यांचा चेहरा प्रसन्न होतो.  सगळ्यांनाच रेल्वेचा कुठला ना कुठला प्रवास नेहमी आठवत असतो. रेल्वे स्टेशनवर जमणारे प्रवासी एकाच दिशेला जात असले तरी त्यांचे स्वभाव वेगळे असतात. प्रवासामुळे त्यांना एकमेकांचा सहवास घडतो किंवा इच्छा नसताना हि त्यांना एकमेकांचे सहयात्री बनावं लागतं. त्यानून कधी संघर्ष निर्माण होतात तर कधी संकट. कधी मजेदार प्रसंग येतो तर कधी भीतीदायक.
 असलेच काही प्रसंग आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. तर करायची लोहमार्गी कथांना सुरुवात. गोष्टी ज्या  ट्रेन मध्ये सापडल्या.
सगळ्या गोष्टी आणि पात्र लेखकाच्या कल्पनेवर आधारीत आहेत. कुठल्या हि जीवित किंवा मृत पात्राशी साम्य  वाटल्यास तो एक योग योग समजावा.
 दर आठवड्याला एक गोष्ट मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित केली जाईल.





No comments:

Post a Comment